ऑनलाईन टीम / ब्रासिलिया :
ब्राझीलमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येने 55 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत 55 लाख 67 हजार 126 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 1 लाख 60 हजार 548 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
मंगळवारी ब्राझीलमध्ये 12 हजार 920 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 276 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. 55.67 लाख कोरोनाबाधितांपैकी 50 लाख 28 हजार 216 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 3 लाख 78 हजार 362 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामधील 8318 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
दरम्यान, जगात कोरोना संक्रमणाचा वेग अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 96 लाख 93 हजार 632 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 2 लाख 38 हजार 656 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर रुग्णवाढीच्या संख्येत भारताचा दुसरा तर ब्राझीलचा तिसरा क्रमांक लागतो.