प्रतिनिधी / शाहुवाडी
व्यंगापेक्षाही त्यांच्यातील गुणवत्ता आणि बौद्धीकता या जोरावर अनेक दिव्यांग बांधवानी आपल्या जिद्दीच्या बळावर यशोशिखर केलं आहे. हे इतरांना ही प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन शाहुवाडी पोलीस ठाण्याचे सपोनि भालचंद्र देशमुख यांनी शाहुवाडी येथे केले. आयोजित जागतिक दिव्यांग दिन कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी दिव्यांग सेनेचे अध्यक्ष बी. एस. पाटील हे होते. पुढे बोलताना देशमुख म्हणाले कि आपण कसे आहोत या पेक्षा आपल्यात असलेले सुप्त गुण जागृत करून आपण आपल्या ध्येयाकडे पाहील पाहीजे मी दिव्यांग आहे आणि मी काय करू असा विचार न करता जरी मी दिव्यांग असलो तरी सुद्धा माझा आत्मविश्वास आणि प्रबळ इच्छा शक्तीच्या बळावर मी यशस्वी होणारच असा सकारात्मक विचार करण गरजेच आहे.
प्रास्ताविक पर मनोगतात आस्था दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष प्रा.बाजीराव वारंग यांनी दिव्यांगांच्या विविध योजनांविषयी माहिती सांगितली. तसेच संस्थेच्या दहा वर्षातील विविध कार्यक्रमांची माहिती सांगितली,नियोजित प्रकल्पासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते निराधार दिव्यांगांना ब्लॅंकेट, धान्य स्वरूपात, जीवनावश्यक वस्तू, दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. कार्यक्रमास सलागार चंद्रकांत खाके, सौ .प्रतिभा वारंग, तानाजी पाटील, पांडुरंग कांबळे, शालन पा प्रतिभा वारंग, तानाजी पाटील, पांडुरंग कांबळे, शालन पाटील, वंदना उबाळे, उषा गोसावी सह दिव्यांग बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.