चिपळूण डी.वाय.एस.पी. पथकाची कारवाई
गुहागर/ प्रतिनिधी
गुहागर पोलीस ठाणे हद्दीतील बो-या गावात एक महिला गावठी हातभट्टीची व विदेशी बनावटीची दारु विक्रीचा चोरुन व्यवसाय करीत असल्याचे विश्वसनीय बातमी मिळाल्याने त्या ठिकाणी डी.वाय.एस.पी पथकाने सदर महिलेच्या घरी छापा टाकून गावठी व विदेशी मद्य जप्त केले आहे, या कारवाईमुळे ज्यांनी अशा अवैध धंद्यांनाआळा घालावयाचा आहे , ते उत्पादन शुल्क विभाग नक्की करतंय काय असा सवाल उठत आहे.
यामध्ये सुप्रिया संदेश ठाकुर, नितेश दिनेश आरेकर यांना गावठी दारू व विदेशी मद्यसह ताब्यात घेतले. या छाप्यात एलपी प्रिमीयमची ४७ बिअर बाँटल (६५० मिली), किंगफिशरची ४९ बिअर बाँटल (६५० मिली), फाँस्टरची २ बिअर बाँटल (६५० मिली), इंपेरीयल ब्लू व्हिस्की १४७ बाँटल (१८० मिली), गोल्डन एस व्हिस्की १४ बाँटल (१८० मिली), डिएसपी ब्लँक व्हिस्की ५४ बाँटल (१८० मिली), मँकडावेल नं. १ रम १० बाँटल (१८० मिली), मँकडावेल नं. १ व्हिस्की ४८ बाँटल (१८० मिली), मँकडावेल नं. १ व्हिस्की १२ बाँटल (७५० मिली), आँफिसर चाँईस व्हिस्की १६ बाँटल (१८० मिली), डायरेक्टर्स स्पेशल व्हिस्की २७ बाँटल (१८० मिली), ३५ लीटर गावठी हातभट्टीची दारु असलेले ३ कँन, एलपी प्रिमीयम ची बिअरची ४८ बाँटल (६५० मिली) हा मुद्देमाल मिळून आला आहे.
तसेच ५,००,०००/- रुपये किमतीची मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर कार असा एकुण ५,८१,९९२/- किमतीचा माल जप्त करण्यात आलेला आहे. 2 आरोपी यांचेविरूध्द गुहागर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ४१/२०२० महाराष्ट्र प्रोव्हिबिशन अँक्ट कलम ६५(ई), ८३,९० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर कारवाई मध्ये सपोफौ/३९२ चव्हाण, पोना/५०६ शेख, पोना/१२२२ सकपाळ, पोना/१२५६ जाधव, मपोना/९०८ काजारी यांनी सहभाग घेतला.









