प्रतिनिधी/ गुहागर :
बोऱया येथे बुधवारी रात्री उशीरा एका महिलेच्या घरी छापा टाकून तब्बल 5 लाख 81 हजार 992 रूपयांची मद्यसाठा पोलीसांनी जप्त केला आहे. यामध्ये गावठी व विदेशी दारूचा समावेश असून याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
बोऱया येथे एका महिलेच्या घरात अवैध दारू साठा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार डीवायएसपी ढवळे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने बुधवारी रात्री उशीरा छापा टाकून हा मद्यसाठा जप्त केला. याप्रकरणी सुप्रिया संदेश ठाकुर, नितेश दिनेश आरेकर या दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी असून 5 लाख रूपयांची मारूती स्विफ्ट डिझायर कारही ताब्यात घेतली आहे.
पोलीसांनी टाकलेल्या या छाप्यात एलपी प्रिमीयम कंपनीच्या 47 बिअर बॉटल (650 मिली), किंगफिशर बियरच्या 49 (650 मिली), फॉस्टर बियरच्या 2 (650 मिली), इंपेरीयल ब्लू व्हिस्कीच्या 147 (180 मिली), गोल्डन एस व्हिस्कीच्या 14 (180 मिली), डिएसपी ब्लँक व्हिस्कीच्या 54 (180 मिली), मॅकडावेल नं. 1 रमच्या 10 (180 मिली), मॅकडावेल नं. 1 व्हिस्कीच्या 60 (930 मिली), ऑफिसर चॉईस व्हिस्कीच्या 16 (180 मिली), डायरेक्टर्स स्पेशल व्हिस्कीच्या 27 (180 मिली), एलपी प्रिमीयम बियरच्या 48 (650 मिली) बॉटल्स व 35 लीटर गावठी हातभट्टीची दारु असलेले 3 कॅन असा एकूण 5 लाख 81 लाख 992 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.









