वारणानगर / प्रतिनिधी
बोरीवडे (ता.पन्हाळा) येथे राहत्या घरातून अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवुन नेले प्रकरणी एका तरूणा विरोधात कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून प्रदिप रंगराव शिंदे रा.बोरीवडे (ता.पन्हाळा) असे त्याचे नाव आहे.
या बाबत अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी कोडोली पोलिसात फिर्याद दिली. यामध्ये गावातील प्रदीप याने माझ्या १७ वर्ष १० महिन्याच्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचे म्हटले आहे. तसेच ती अल्पवयीन आहे हे माहित असताना सुद्धा दि.१ रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास राहत्या घरातून कोणतेतरी अमिष दाखवून पळवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक नरेंद्र पाटील हे करीत आहेत.
Previous Articleतीन आमदारांमुळे इच्छुकांचा काँग्रेसकडे कल !
Next Article पोलीस अधीक्षकांविरुध्दच्या तक्रारीची 14 रोजी सुनावणी









