प्रतिनिधी / सरवडे
बोरवडे ( ता. कागल ) येथील एका आठवर्षीय मुलीची छेडछाड करणाऱ्या संशयिताला ग्रामस्थांनी पकडून बेदम चोप दिला. या घटनेतील संशयित चोवीस वर्षीय तरुण हा राधानगरी तालुक्यातील असल्याचे समजते.
याबाबत घटनास्थळावरुन समजलेली माहिती अशी, आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास बोरवडेतील विठ्ठल मंदिरानजिक लहान मुले खेळत होती.यावेळी संशयित तरुणाने आठवर्षीय मुलीशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने भेदरलेल्या मुलीने संशयिताच्या हाताला हिसका देवून जवळच असलेल्या घरी पळ काढला.
संबंधित बालिकेने घडलेली घटना घरी सांगताच तिच्या पालकांनी परिसरात शोधाशोध केली. यावेळी मोटरसायकलवरुन जाणाऱ्या या तरुणाला पाहताच मुलीने त्याला ओळखले. त्याने शेताकडील रस्त्यावरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला.
ग्रामस्थांनी त्याचा पाठलाग केला असता, संशयित गाडी टाकून ऊसाच्या शेतात लपून बसला. ग्रामस्थांनी शोधाशोध केली असता तो त्यांच्या हाती लागला. यावेळी ग्रामस्थांनी त्याला बेदम चोप दिला. या तरुणाने गावामध्येही असा प्रकार यापुर्वीही केल्याची चर्चा आहे.
Previous Articleपुणे विभागातील 4 लाख 8 हजार 495 रुग्ण कोरोनामुक्त!
Next Article खटावमध्ये भराव ढासळून रस्ता तुटला









