खेड / प्रतिनिधी
मुंबई – गोवा महामार्गावरील बोरज नजीक महावितरणच्या तुटलेल्या विद्युतभारित तारेच्या स्पर्शाने पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडली. प्रकाश गोपाळ घोसाळकर वय 55, वंदना प्रकाश घोसाळकर वय 51 अशी मृत पती-पत्नीची नावे आहे. ते लोटे येथून दुचाकीने घरी येत असताना ही घटना घडली.









