प्रतिनिधी / नागठाणे
बोरगाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे खारघर(नवी मुंबई) येथून चोरीस गेलेला ट्रक पुन्हा मूळ मालकाला परत मिळाला.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवार १५ ऑक्टोबर रोजी बोरगाव पोलीस ठाण्याचे सपोनि डॉ. सागर वाघ,पीएसआय वर्षा डाळींबकर, हवालदार मनोहर सुर्वे, राजू शिखरे, विजय साळुंखे, विशाल जाधव, किरण निकम हे भागात पेट्रोलिंग करत असताना नागठाणे ( ता.सातारा ) येथे महामार्गावर एक आयशर मालट्रक संशयास्पदरीत्या उभा असलेला आढळला. पोलिसांनी चालकाकडे कागदपत्रांची चौकशी केली असता चालकाने कागदपत्रे जवळच्या गैरेजवर ठेवली आहेत. ती घेऊन येतो असे सांगून निघून गेला. बराच वेळ होऊनही चालक परत न आल्याने पोलिसांनी ट्रक पोलीस ठाण्यात आणला.
केबिनची तपासणी करताना पोलिसांना इन्फ्रा केमिकल प्रा.लि. कंपनीचे एक चलन मिळाले. तेथे चौकशी करता त्यांना सदर ट्रक हा पाशा उस्मान शेख (रा. साईसदन सोसायटी,से.१९,मुर्बी गाव,खारघर,नवी मुंबई) यांच्या मालकीचा असून तो १२ ऑक्टोबर ला तेथून चोरीस गेल्याचे व त्याची फिर्याद खारघर पोलीस ठाण्यात झाल्याचे समजले.चोरट्याने ट्रकची नंबरप्लेटही बदलली असल्याचे निष्पन्न झाले. बुधवारी पोलिसांनी ट्रक मालकाला बोरगाव पोलीस ठाण्यात बोलावून सदर ट्रक त्यांच्या ताब्यात दिला.
Previous Articleसांगली जिल्ह्यात कोरोनाचे 191 नवे रूग्ण तर 244 कोरोनामुक्त
Next Article दरेकर साहेब तेवढं जम्बो हॉस्पिटलकडं बघा









