मृत बोरगाववाडीचा – दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ
प्रतिनिधी/ निपाणी
बोरगाव (ता. निपाणी) येथील विश्वनाथ स्टोन क्रशर येथे एकाचा खणीत पडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली आहे. अमोल मल्लू शिंदे (वय 26, रा. बोरगाववाडी) असे मृत युवकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, मयत अमित हा गेल्या अनेक वर्षांपासून या स्टोन पेशर येथे कामाला होता. नेहमीप्रमाणे खणीच्या वर काम करीत असताना तोल गेल्याने तो खोल खणीत पडला व त्याचा जागीच मृत्यू झाला.
मयत अमोल हा येथील स्टोन पेशरवर मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होता. घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. त्याच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अत्यंत मनमिळावू व प्रामाणिक अमोल शिंदे याचा अचानक मृत्यू झाल्याने बोरगाववाडीसह बोरगाव शहरातील नागरिक ांतून हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक आर. आर. पाटील व पोलीस उपनिरीक्षक आर. वाय. बिळगी यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली. सदलगा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. भाऊ अमित शिंदे यांनी सदलगा पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. मृत अमोलच्या पश्चात आई, वडील, भाऊ, मामा, मामी, चुलते असा परिवार आहे.









