9 जागांवर विजय : नव्या सहकाऱयासोबत सत्ता प्राप्त करणार
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
भाजप नवा सहकारी युनायटेड पीपल्स पार्टी लिबरेशनसोबत (यूपीपीएल) बोडोलँड टेरिटोरियल कौन्सिलची (बीटीसी) सूत्रे स्वीकारण्यास तयार आहे. भाजपने या निवडणुकीत 9 जागांवर विजय मिळविला आहे. बोडोलँड पीपल्स प्रंट (बीपीएफ)सोबतच्या भाजपच्या मैत्रीत आता कटूता आली आहे. बीटीसी निवडणुकीत बीपीएफला 40 पैकी 17 जागा मिळाल्या आहेत. गृहमंत्री अमित शाह यांनीही यूपीपीएल आणि राज्याचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांचे या विजयानिमित्त अभिनंदन केले आहे.
या निवडणुकीत यूपीपीएलला 12 तर भाजपला 9 जागांवर विजय मिळाला आहे. काँग्रेस आणि गण सुरक्षा पक्षाला (जीएसपी) प्रत्येकी एका जागेवर यश मिळाले आहे. अधिकृतपणे भाजप आणि यूपीपीएलने स्वतंत्रपणे निवडणूक लढविली होती, परंतु निवडणुकीनंतर दोघांचीही आघाडी होणार असल्याचे मानले जात असून गुवाहाटीत या दृष्टीने हालचालीही सुरू झाल्या आहेत.









