प्रतिनिधी / महाबळेश्वर :
महाराष्ट्चे नंदनवन म्हणुन प्रसिध्द असलेल्या महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी नाताळ पाठोपाठ नविन वर्षाच्या स्वागतासाठी आलेल्या पर्यटकांना येथील वेण्णालेक मध्ये नौका विहाराचा मनमुराद आनंद लुटला पर्यटकांच्या या प्रतिसादामुळे पालिकेला बोटक्लब पासुन 20 डिसेंबर ते 5 जाने या काळात सुमारे 43 लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले 29 जानेवारी रोजी याच बोटक्लब पासुन एका दिवसात 3 लाख 64 हजार 400 रूपयांचे विक्रमी उत्पन्न मिळाले आहे
राज्यातील क्रमांक एकचे थंड हवेचे ठिकाण म्हणुन महाबळेश्वर प्रसिध्द आहे राज्याचे मिनी काश्मिर म्हणुन ज्या स्थळाची देशात ओळख आहे त्या महाबळेश्वर येथे नाताळ आणि नविन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक एकच गर्दी करतात सर्वसमान्यां पासुन ते अति श्रीमंत असलेल्या उदयोगपती पर्यंत सर्वाची पसंती महाबळेश्वर या पर्यटन स्थळाला आहे येथे सहलीसाठी आलेल्या बहुतांशी पर्यटक हे वेण्णालेक येथे नौका विहाराचा आनंद लुटल्या शिवाय परत जात नाही नौका विहार केल्या शिवाय महाबळेश्वरची सहल केली असे वाटत नाही त्या मुळे नौका विहारासाठी सकाळ संध्याकाळ पर्यटकांच्या येथे रांगा दिसतात हंगामात या रांगा वाढतात त्या मुळे पालिकेचे उत्पन्नही चांगलेच वाढते पालिकेच्या वेण्णा लेक येथील बोटक्लब मध्ये 34 रोईंग बोटी तर 18 पॅडल अशा एकुन 52 बोटी होत्या या बोटी कमी पडत होत्या म्हणुन पालिकेने नुकत्याच 24 पॅडल बोटी खरेदी केल्या मुळे बोटक्लबच्या उत्पन्नात चांगलीच वाढ झाला आहे पालिकेला या बोटक्लब पासुन केवळ 17 दिवसांच्या हंगामात 43 लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे आज पर्यंत येथे एका दिवसात मिळालेल्या उत्पन्नाचा विक्रम या वर्षी येथील कर्मचारी वर्गाने मोडला असुन या वर्षी येथे एका दिवसात विक्रमी 3 कोटी 64 लाख 400 रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली येथे आबाजी ढोबळे शरद म्हस्के अरूण बावळेकर व विठ्ठ्ल जाधव हे अधिकारी व मोठया संख्येने असलेले बोटमन ही टिम राबत आहे या कर्मचारी यांनी घेतलेल्या मेहनतीमुळेच पालिकेच्या उत्पन्नात घसघशीत वाढ झाल्याची माहीती पालिकेच्या सुत्रांनी दिली









