जीवाचा गोवा करणे पडले महागात
प्रतिनिधी/ पणजी
जीवाचा गोवा करणाऱया बॉलीवुडच्या दोन नृत्य प्रशिक्षकांना गोवा पोलिसांनी दणका दिला आहे. येथील अटलसेतू पुलावर रेमो डिसोझा व सलमान युसूप खान यांनी मोटर सायकल स्टंट करून त्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल केला होता. गोवा पोलिसांनी त्याची दखल घेऊन दोघांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
या दोघांनाही दंड ठोठावून नियमांचा भंग केल्याप्रकरणी तसेच बेशिस्त वाहन चालविल्या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. दोघांनाही जीवाचा गोवा करणे महागात पडल्याचे दिसून येत आहे. लवकरच दोघांनाही समन्स बजावण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
रेमो डिसोझा (46) हा बालीवुड क्षेत्रात नृत्य प्रशिक्षक प्रचिलीत आहे. अनेक नामांकीत नृत्य स्पर्धांना तो परिक्षक म्हणून काम करतो. डान्स इंडीया डान्स सारख्या सुप्रसिध्द कायक्रमातही त्यांने परिक्षक म्हणून काम केले आहे. 1995 मध्ये रिलीज झालेल्या राम गोपाल वर्मा यांच्या रंगीला चित्रपटासाठी काम केले आहे. सलमान युसूफ खान (35) हा डान्स इंडीय डान्स स्पर्धेचा माजी विजेता आहे. त्याने खतरो का खीलाडी, झलक दिखलाजा अशा अनेक प्रसिध्द टीव्ही शो मध्ये काम केले आहे.
गोव्यात एका चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असून त्या चित्रपटात सलमान युसूफ व रेमो डिसोझा हे दोघेही नृत्य प्रशिक्षक म्हणून काम करीत आहेत. मागीला आठवडय़ा दोघांनीही दोन अत्यधुनिक मोटर सायकल घेऊन अटलसेतूवर स्टंट केला होता. ते पर्वरीहून मडगावच्या दिशेने जात होते. एक चित्रपट गाण्यावर त्यांचा स्टंट सुरु असून तो चित्रीत केला व सोशल मिडीयावर व्हायरल केला होता. हा व्हिडीओ सगळीकडे पसरताच त्याच्यावर अनेक प्रतिक्रीया उमटल्या होत्या. अटलसेतूवर दुचाकी वाहन नेण्यास बंदी असताना हे दोघे अटल सेतूवर दुचाकी घेऊन केसे गेले वाहतूक पोलिसांवरही काहीजणानी ताशेरे ओडले होते. पोलिसांना हा व्हिडीओ मिळताच त्यांनी त्वरीत कारवाई केली. दोघांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
दोघांनीही कळंगुट येथून दुचाकी भाडय़ाने घेतल्या होत्या. दोन्ही दुचाकी या बेकायदेशीररित्या भाडय़ाने दिल्या असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्यामुळे दुचाकी मालकांनाही दंड ठोठावण्यात येणार आहे. कळंगुट पोलिसांनी दोन्ही दुचाकी जप्त केल्या असून पुढील कारवाई करीत आहे. sसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.









