चंकी पांडे यांची कन्या आणि अभिनेत्री अनन्या हिने चित्रपटसृष्टीत दोन वर्षे पूर्ण केली आहेत. तिचा पदार्पणातील चित्रपट 10 मे 2019 रोजी चित्रपटगृहांमध्ये झळकला होता. यानिमित्त अभिनेत्रीने चाहत्यांकडून तयार करण्यात आलेला काही कंटेंट सोशल मीडियावर शेअर करत सर्वांचे आभार मानले आहेत. अनन्या लवकरच विजय देवरकोंडासोबत लाइगर या चित्रपटात दिसून येणार आहे.
मागील दोन वर्षांचा प्रवास उत्तम राहिला आहे. मी प्रत्यक्षात खूप आभारी आहे, कारण मी स्वप्नच जगत आहेत. भोवतालच्या सर्व लोकांचे प्रेम, प्रोत्साहन, ज्ञान आणि सल्ल्याशिवाय हे शक्य झाले नसते. ज्यांच्यासोबत काम केले असे सर्व तंत्रज्ञ, दिग्दर्शक, अभिनेत्यांची आभारी आहे. यातील प्रत्येकाकडून काहीतरी शिकले आहे. तसेच ही वाटचाल माझ्या चाहत्यांशिवाय शक्य नव्हती. त्यांचे प्रेम मला मिळत राहिल्याने काम करण्यासाठी दुप्पट प्रेरणा मिळाली आहे. यापुढेही मी कठोर मेहनत करत राहणार आहे. शिकणे कधीच बंद करणार नसल्याचे उद्गार अनन्याने काढले आहेत.









