बाळेपुंद्री / वार्ताहर
बैलहोंगल शहरातील चन्नम्मा समाधी रस्त्याजवळ असलेल्या एका हॉटेल दुकानाला आग लागून हॉटेलातील दोन लाखाहून अधिक किमतीचे साहित्य आगीत भस्मसात झाल्याची घटना मंगळवारी रार्त्रीच्या सुमारास घडली.
बैलहोंगल येथील चन्नम्मा समाधीच्या प्रमुख प्रवेशव्दाराजवळ बैलहोंगल येथील राजू कोठारी यांचे हॉटेल आहे. मंगळवारी रार्त्री दहा वाजता नेहमी प्रमाणे हॉटेल बंद करून घरी गेले होते याच मध्यरार्त्रीच्या सुमारास लागलेल्या या आगीत हॉटेलात ठेवण्यात आलेले फर्निचरसह, टेबल. छत, हॉटेलाचे सामुग्री संपूर्ण जळून भस्मसात झाले आहे. हॉटेलात असलेल्या विद्युत तारा एकमेकाना घासून (शार्टसर्किट) निर्माण झालेली ठिणगी पडून ही आग लागल्याने संशय व्यक्त होत आहे. सुदैवाने हॉटेलात ठेवण्यात आलेला पूर्ण भरलेला सिलिंडर गॅस स्फोट झाला नाही. तर मोठया प्रमाणात धोका उद्भवला असता संभाव्य धोका उदभवला असता .,या घटनेची माहिती कळताच बैलहोंगल येथील अग्नीशामक दलाची पाण्याची गाडी घटनास्थळी हजर होऊन आग आटोक्यात आणली. या घटनेची नोंद बैलहोंगल पोलीस ठाण्यात झाली आहे.









