वार्ताहर / बाळेकुंद्री
हन्नीकेरी (ता. बैलहोंगल) येथील सरकारी मॉडेल उच्च व लोअर प्राथमिक शाळेतील शिक्षकांना प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने शनिवारी मोफत आरोग्य किटचे वितरण करण्यात आले. यावेळी नवीन वर्षारंभ व गेल्या महिन्यात प्राथमिक शिक्षक संघाच्या निवडणुकीत बैलहोंगल तालुक्यात सर्व पदाधिकाऱयांना अविरोध निवडून दिल्याबद्दल बैलहोंगल तालुक्यातील सर्व सरकारी प्राथमिक शाळेतील शिक्षकांना आरोग्य किटचे मोफत वितरण करण्यात आले.
यावेळी बैलहोंगल तालुका अध्यक्ष बी. व्ही बानी, एस. डी. गंगन्नावर, बी. वाय. बागले, शिवानंद कुडसोमन्नावर, एम. ए. लगमन्नावर व हेमा कुलकर्णी उपस्थित होते. प्रारंभी शाळेच्या सभाभवनात उपस्थित नूतन शिक्षक पदाधिकाऱयांचे शाळेच्यावतीने स्वागत करण्यात आले. यावेळी हन्नीकेरी परिसरातील शिक्षकवर्ग उपस्थित होता.









