राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा अध्यक्ष संदेश भोसले यांची महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
कुंभोज / वार्ताहर
ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळण्यासाठी बैलगाडी शर्यत गरजेची असून राज्यशासनाने अध्यादेश काढून बंदी घातलेल्या बैलगाड्यांच्या शर्यती पुन्हा सुरु कराव्यात , अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष संदेश भोसले यांनी मुख्यमंत्री महोदयांना ईमेल द्वारे व ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ यांना निवेदनाद्वारे केली. सदर निवेदन महिला प्रदेशाध्यक्ष सौ.रूपालीताई चाकणकर, जिल्हाध्यक्ष मा.ए.वाय.पाटील, कार्याध्यक्ष अनिल साळोखे, शहराध्यक्ष आर.के.पोवार, महिला जिल्हाध्यक्ष सौ.शितलताई फराकटे, सौ. स्मिताराणी गुरव.सालपे वहिनी, युवक शहराध्यक्ष महेंद्रदादा चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, राज्याला बैलगाडी शर्यतींची मोठी परंपरा आहे. ग्रामीण अर्थकारण या शर्यतीच्या खेळांवर अंवलंबून आहे. बैलगाडी शर्यतीच्या निमित्ताने व्यापारी वर्ग, वाहतूक व्यावसायिक, छोटे व्यावसायिक, बैलगाडी व्यवसायिक यांची नाळ या व्यावसायाशी जोडली गेली आहे. बैलगाडी शर्यती बंदीचा निर्णय झाल्यापासून या खेळाशी निगडीत सर्व व्यवसायांना मंदीचे दिवस आले आहेत, ही मरगळ झटकून टाकण्यासाठी आणि येथील अर्थकारणाला चालना मिळण्यासाठी शर्यती सुरु करणे हाच एकमेव पर्याय आहे.
महाराष्ट्रात बैलगाडी शैयतींमध्ये खिलार ह्या जातीचे बैल वापरले जात असतात. खिलार ही जमात देशी गाईचा वंश म्हणून ओळखली जाते. खिलार जातीचे बैल शेतीमध्ये मशागत करण्यासाठी चांगल्या जातीचे बैल म्हणून ओळखले जात असतात. या बैलांची शाररिक क्षमता वाढविण्यासाठी शर्यत सारख्या खेळांची गरज आहे. शासनाने या सार्या गोष्टींचा तातडीने विचार करण्याची आवश्यकता आहे. इतर राज्यात बैलशर्यत सुरू मग महाराष्ट्रातच शर्यतीला बंदी का? असा सवाल शर्यतप्रेमी संदिप तोरस्कर यांनी केला.
बैलगाडी शर्यत हा ग्रामीण भागातील एकेकाळी महत्वाचा खेळ मानला जात होता. या खेळाशी ग्रामीण भागातील लाखो तरुणांचे भावनिक नाते आहे. ग्रामीण भागात यात्रोत्सवात भरविण्यात येणार्या बैलगाडी शर्यतींच्या निमित्ताने होणारी अर्थिक उलाढाल ही मोठी आहे. या बाबींचा विचार करुन बैलगाडी शर्यत सुरु करावी अशी मागणी तालुकाध्यक्ष डी.बी.पिष्टे यांनी मुश्रीफ यांंना केली. त्यावेळी बी.के.चव्हाण साहेब, नूतन महिला कार्याध्यक्ष सौ.दिपालीताई नलवडे, मोहन चौगुले, निहाल कलावंत, शहानवाज मुजावर, अल्ताफ हजरत, निलेश शिंगे, धनाजी पाटील, सौरभ निगवे, मयूर राजमाने, अविनाश गुरव आदी.शर्यतप्रेमी उपस्थित होते.








