फलटण / प्रतिनिधी :
फलटण शहर व परिसरात विविध गुन्ह्यात जप्त केलेली व अज्ञात बेवारस वाहन म्हणून जप्त केलेली दोनचाकी, तीनचाकी, व चारचाकी अशी एकूण 56 वाहने गाडीच्या मूळ मालकांनी योग्यती कागदपत्रे जमा करून 15 सप्टेंबर 2021 पूर्वी घेऊन जावीत. अन्यथा सदर वाहनांचा लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती फलटण शहर पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
याविषयी सविस्तर माहिती अशी, फलटण शहर पोलीस ठाणे अंतर्गत विविध गुन्हातील जप्त केलेली व बेवारस स्थितीत आढळून आलेली 45 दुचाकी, 6 रिक्षा व 5 चारचाकी वाहने अशी एकूण 56 वाहने फलटण शहर पोलीस ठाणे येथे आहेत. सातारा जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या आदेशा नुसार दिनांक 15 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत सदर वाहने आपली मालकी सिद्ध करून घेऊन जावीत. अन्यथा सदर वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे.
सदर वाहनांची यादी फलटण शहर पोलीस ठाणे परिसरात लावण्यात आली आहे. निर्धारित वेळेनंतर वाहनांचा लिलाव झाल्यानंतर कोणताही हक्क व दावा विचारात घेतला जाणार नसल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. लीलावात भाग घेणाऱ्याकडे स्क्रॅप लायसन्स असणे अनिवार्य असून पंधरा हजार रुपये अनामत रक्कम भरणे आवश्यक आहे, असेही त्यात नमूद केले आहे.