वार्ताहर/ किणये
बेळगुंदी गावचे ग्रामदैवत रवळनाथ देवाच्या यात्रेला गुरुवारपासून साधेपणाने प्रारंभ झ्घला. कोरोनामुळे व प्रशासनाच्या नियमावलीनुसार यात्रा गाव मर्यादित करण्याचे ग्रामस्थ पंच कमिटी व देवस्थान कमिटी यांच्यावतीने ठरविण्यात आले.
गुरुवार दि. 27 रोजी पासून यात्रेला प्रारंभ झाला. गुरुवारी सकाळी रवळनाथ देवाची विधिवत पूजा अर्चा करून अभिषेक करण्यात आला.
शुक्रवार दि. 28 रोजी यात्रेचा मुख्य दिवस आहे. कोरोना महामारीच्या संकटामुळे व सरकारच्या आदेशाचे पालन करून गावकऱयांनी विशेष बैठक घेऊन यंदाचा महाप्रसाद रद्द केला आहे. शुक्रवारी सकाळी गावामधील सर्व देवदेवतांची पूजा अर्चा करण्यात येणार आहे. यावेळी गावातील महिला कलश घेऊन उपस्थित राहणार आहेत. दुपारी 12 नंतर गाऱहाणा कार्यक्रम होणार असून दुपारी गाऱहाणा झाल्यानंतर सर्वांना नारळ फोडता येणार आहेत.
शनिवार दि. 29 रोजी यात्रेची सांगता होणार आहे. शनिवारीही भक्तमंडळी रवळनाथाचे दर्शन घेऊन नारळ वाहणार आहेत.
यात्रेनिमित्त गुरुवारपासून शनिवारपर्यंत तीन दिवस गावात कडक पाळणू करण्यात आली आहे.









