वार्ताहर/ तुडये
बेळगुंदी येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने प्रशासन सतर्क बनले आहे. ग्रामस्थांनी सुरक्षित रहावे, यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने रविवारी रात्री 10 ते बुधवार दि. 15 एप्रिल रोजी सकाळी 10 पर्यंत घरातून कोणीही बाहेर न पडण्याची सूचना केली आहे. यामुळे सोमवारी दिवसभर ग्रामस्थांनी घरातच राहणे पसंत केल्याने संपूर्ण गावात शुकशुकाट दिसत होता.
सकाळी बेळगाव ग्रामीणच्या सीपीआय कृष्णवेणी यांच्यासह पोलीस फौजफाटा बेळगुंदीत दाखल झाला. ग्राम पंचायतीच्या कार्यालयाजवळून ड्रोन कॅमेऱयाच्या साहाय्याने संपूर्ण गावावर देखरेख करण्यात आली. संपूर्ण गल्ल्या निर्मनुष्य होत्या. गावातील संपूर्ण किराणा दुकाने, दूध संस्था, पशुखाद्य दुकाने बुधवारपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.









