क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव

एमसीसीसी स्पोर्ट्स क्रिकेट अकादमी आयोजित हनुमान चषक निमंत्रितांच्या 14 वर्षाखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत खेळविण्यात आलेल्या सामन्यात रॉजर्स क्लबने एमसीसी ब संघाचा 6 गडय़ानी, अर्जुन स्पोर्ट्सने एमसीसीसी अ संघाचा तर बेळगाव स्पोर्ट्स क्लबने एमसीसीसी ब चा पराभव करून प्रत्येकी 4 गुण मिळविले. विजय हलवी, स्वरूप साळुंखे, सोहम पाटील यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
सोमवारी सकाळी खेळविण्यात आलेल्या सामन्यात एमसीसीसी ब संघाने 16.4 षटकात सर्व बाद 66 धावा केल्या. प्रणय बस्तवाडने 15 धावा केल्या. त्याच्या व्यतिरिक्त अन्य एकही फुलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. बेळगाव स्पोर्ट्स क्लबतर्फे सोहम पाटीलने 19 धावात 5, अभिनव चव्हाणने 14 धावात 3 तर जयशांत सुब्रम्हण्यम व लाभा वेर्णेकर यानी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना बेळगाव स्पोर्ट्स क्लबने 11.1 षटकात बिनबाद 68 धावा करून सामना 10 गडय़ानी जिंकला. संचित सुतारने 4 चौकारासह 45 धावा केल्या.
रविवारी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात एमसीसीसी ब संघाने 23.3 षटकात सर्व बाद 113 धावा केल्या. त्यात वेदांत माळगीने 54 धावा केल्या. रॉजर्सतर्फे विजय हलवीने 17 धावात 3 तर स्वयम किल्लेकरने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल रॉजर्स क्लबने 17.5 षटकात 4 बाद 114 धावा करून सामना 6 गडय़ानी जिंकला. पृथ्वी पावशेने 27, युवराज सांबरेकरने 20, जीवन बेन्नकट्टीने 19 धावा केल्या. एमसीसीसीतर्फे झोया काझी व अब्दुल रेहमान यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
रविवारच्या दुसऱया सामन्यात एमसीसीसी अ संघाने 24.5 षटकात सर्व बाद 114 धावा केल्या. मोहित सय्यदने 26, गणेश हालपगोळने 22, मलिक मुल्लाने 20 धावा केल्या. अर्जुन स्पोर्ट्सतर्फे स्वरूप साळुंखेने 18 धावात 4 तर आदी नलवडेने 31 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल अर्जुन स्पोर्ट्सने 24.3 षटकात 9 बाद 115 धावा करून सामना एका गडय़ाने जिंकला. त्यात गौरवने 18 तर आदी नलवडेने 13 धावा केल्या.









