मागील वषीच्या तुलनेत यावषी तीन पटीने प्रवासी संख्येत वाढ : दिल्ली फेरीला उत्तम प्रतिसाद
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोना काळातही विमान प्रवाशांची संख्या कमालीची वाढली आहे. मागील वषीच्या तुलनेत यावषी तीन पटीने प्रवासी संख्या वाढली आहे. बेळगाव विमानतळाने राज्यात आपले तिसरे स्थान कायम ठेवले आहे. एप्रिल ते सप्टेंबर या पाच महिन्यांच्या कालावधीत मागील वषीपेक्षा यावषी बेळगाव विमानतळाच्या प्रवासी संख्येत 84.30 टक्के वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
बेंगळूर व मंगळूर या दोन आंतरराष्ट्रीय विमानतळांनंतर बेळगावच्या विमानतळाने प्रवासी संख्येतील आपले स्थान कायम ठेवले आहे. शेजारी असणाऱया हुबळी विमानतळाला टक्कर देत प्रवासी संख्येत बेळगाव अव्वलस्थानी राहिले आहे. बेळगावमधून देशातील महत्त्वाच्या शहरांना विमानसेवा उपलब्ध असल्याने प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. स्पाईस जेट, ट्रूजेट, स्टार एअर, इंडिगो, व अलायन्स एअर या कंपन्या बेळगावमधून सेवा देत आहेत.
प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद
बेळगाव विमानतळावरून मागील वषीच्या एप्रिल ते सप्टेंबर महिन्यात 65 हजार प्रवाशांनी प्रवास केला होता. त्याच कालावधीत यावषी तब्बल 1 लाख 21 हजार प्रवाशांनी विमान प्रवास केला असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. देशाची राजधानी असणाऱया दिल्ली शहराला आठवडय़ातून 3 दिवस विमानसेवा दिली जात असल्याने या फेरीला प्रवाशांचा उत्तम असा प्रतिसाद मिळू लागला आहे.
प्रवासी संख्येत झालेली वाढ…
| विमानतळ | एप्रिल ते सप्टेंबर 2021 प्रवासी संख्या | एप्रिल ते सप्टेंबर 2020 प्रवासी संख्या |
| बेंगळूर | 55,60,468 | 24,01,170 |
| मंगळूर | 3,10,143 | 74,159 |
| बेळगाव | 1,21,442 | 65,890 |
| गुलबर्गा | 40,443 | 17,944 |
| हुबळी | 77,495 | 9,074 |









