प्रतिनिधी / बेळगाव
देशांतर्गत विमानसेवेला सोमवार दिनांक 25 पासून सुरुवात करण्यात आली. परंतु महाराष्ट्र राज्याने काही प्रमाणातच विमानसेवेला परवानगी दिल्यामुळे बेळगाव मधून मुंबई पुण्याच्या दिशेने जाणारी विमाने रद्द करण्यात आली आहेत अलायन्स एअर या कंपनीचे विमान पुणे तर स्पाइस जेट विमान मुंबई येथे जाणार होते हे विमान रद्द करण्यात आल्याची माहिती बेळगाव विमानतळ प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.त्याचबरोबर ट्रूजेट कंपनीचे म्हैसूरकडे जाणारे विमानही रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे आज दिवसभरात बेंगलोर, अहमदाबाद, हैद्राबाद या शहरांना विमान जाणार आहेत.









