बेळगाव /प्रतिनिधी
राज्यात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढत्या कोरोनाच्या संख्येमुळे सरकार चिंतेत असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने राज्यात उद्या सोमवारपासून पूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली आहे. राज्यात उद्यापासून संपूर्ण लॉकडाऊनच्या अंमलबजावणीला सुरुवात होईल. दरम्यान बेळगाव शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. शहरातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाला रोखण्यासाठी आणि लाॅकडाऊन काळात विविध भागात विनाकारण बाहेर फिरणाऱ्या व्यक्तींवर कायदेशिर कारवाईसाठी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. जर लॉकडाऊन काळात विनाकारण बाहेर फिरताना सापडल्यास दोषी विरुध्द जागेवरच आर्थिक दंडात्मक कारवाई केली जाईल. शहरात मोकाट फिरणाऱ्यांना आळा घालण्यासाठी ही पथके शहरात कार्यरत असणार आहेत. त्यामुळे नागरिकांना कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागणार आहे.
शहरात सकाळी १० वाजल्यानंतर मोकाट फिरणाऱ्या नागरिकांविरुद्ध कडक व दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. केवळ तेवढ्यावरच न थांबता, गरज पडल्यास संबंधित व्यक्तींची वाहनेही जप्त केली जाणार असल्याचा इशारा पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी दिला आहे. शहरात सकाळी ६ ते १० या वेळेत कोणत्याही सबळ कारणाशिवाय घराबाहेर पडल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई होणार आहे.
दरम्यान राज्यात उद्या सोमवारपासून कडक लॉकडाऊन लागू होणार आहेहे. त्यामुळे शहरात सोमवारी सकाळी ६ ते १० या वेळेतही बाजारपेठेत भाजीपाला आणि किराणा माल आणण्यासाठी दुचाकी किंवा चारचाकी वाहतूकीवरही बंदी असणार आहे. त्यामुळे नागरिकांना चालत भाजीपाला आणि किराणा साहित्य आणण्यास जावे लागणार.
लॉकडाऊन दरम्यान, शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची वाहने जप्त करण्यात केली जाणार आहेत. त्याचबरोबर कायदेशीर कारवाई देखील केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना अत्यावश्यक करणास्तवच घराबाहेर पडत येणार आहे. लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात येणार आहेत. लॉकडाऊनच्या काळात शहरात सर्वत्र पोलिसांचा कडक बंदोबस्त असणार आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडल्यास तुम्हाला कारवाईला सामोरं जावं लागू शकतं. लॉकडाऊनवेळी वाहनांना रस्त्यावर फिरकू देऊ नका, असा आदेश शासनाने दिलेला आहे. फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहतूक सुरु राहील. त्यामुळे नागरिकांनी कोरोना नियमांचं पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे. कोरोनावर मात करायची असल्यास घरी राहा, सुरक्षित राहा.









