प्रतिनिधी/ बेळगाव
रेल्वेस्थानकांवर गर्दीच्यावेळी होणारी छेडछाड तसेच गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी नैऋ=त्य रेल्वेने राज्यातील महत्त्वाच्या रेल्वेस्थानकांवर सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय घेतला आहे. बेळगाव रेल्वेस्थानकावर 36 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. केंद्राच्या निर्भया फंडातून हे सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे रेल्वेस्थानकावर आता तिसऱया डोळय़ाची नजर असणार आहे.
बस, रेल्वे अशा गर्दीच्या ठिकाणी महिलांची होणाऱया छेडछाडीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे रेल्वे विभागाने सीसीटीव्ही बसविण्याचा विचार केला आहे. बेळगाव रेल्वेस्थानकावर यापूर्वीही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. परंतु त्यावर मर्यादा येत आहे. तसेच प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे त्यावर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्हीची गजर भासत आहे.
दिल्ली येथे झालेल्या निर्भया प्रकरणानंतर महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया राखीव निधी ठेवण्यात आला आहे. या निधीच्या माध्यमातून रेल्वेस्थानकांवर हे सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. येत्या काही महिन्यांमध्ये हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वेस्थानकाच्या प्रत्येक भागावर नजर ठेवणे सोपे होणार आहे.
6 रेल्वेस्थानकांवर सीसीटीव्हीची नजर
नैऋ=त्य रेल्वेच्या अखत्यारित येणाऱया महत्त्वाच्या 6 रेल्वेस्थानकांवर सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. यामध्ये बेळ्ळारी येथे 33, वास्को येथे 36, बेळगाव 36, बेंगळूर येथे 21, बंगारपेट 36 तर हासन येथे 36 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.









