रामदुर्ग/प्रतिनिधी
बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग शहरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका जोडप्याने आपल्या दोन लहान मुलांसह आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
आत्महत्या केलेल्या व्यक्तींमध्ये प्रवीण शेट्टर (वय ३७), त्यांची पत्नी राजेश्वरी (वय २२), मुले अमृता (वय ८) आणि अदविथ (वय ६) हे सर्व रामादुर्ग शहरातील रहिवासी आहेत. त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा अंदाज आहे.









