बेळगाव/प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आज बेळगाव दौऱ्यावर आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील वाढत्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक घेतली.
दरम्यान मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी बेळगाव दौऱ्यावर असताना जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सुवर्णसौध येथे अधिकारी आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोरोना आणि अन्य महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली.
या बैठकीला बेळगावचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ , उपमुख्यंमत्री लक्ष्मण सवदी, आरोग्यमंत्री के. सुधाकर, गृहमंत्री बसवराज बोम्माई, मंत्री उमेश कत्ती, मंत्री शशिकला जोल्ले, आमदार सतीश जारकीहोळी, आमदार अंजली निंबाळकर, आमदार अनिल बेनके, आमदार रमेश जारकीहोळी, आमदार भालचंद्र जारकीहोळी आणि अधिकारी उपस्थित होते.









