बेळगाव/प्रतिनिधी
भाजपचे दिवंगत नेते आणि माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी यांचा मंगळवारी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
याविषयी मंगला अंगडी यांनी “मी कोरोना पॉझिटिव्ह असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरी अलग राहून उपचार घेत आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना मी चाचणी करून घेण्यास व त्यानुसार डॉक्टरांचा सल्ला घेण्याची विनंती करते,” असे त्यांनी ट्विट केले आहे.
दरम्यान केंद्रीय संसदीय कामकाज, कोळसा आणि खाणी मंत्री प्रल्हाद जोशी यांनी अंगडी लवकरात लवकर कोरोनावर मात करोत अशा शुभेच्छा दिल्या आहेत.
कर्नाटकातील बेळगाव विभागातील लोकसभा खासदार पदासाठी आंगडी ह्या भाजपच्या उमेदवार असून तिथून काँग्रेसकडून सतीश जारकिहोळी हे उमेदवार आहेत. पोटनिवडणुकीचा निकाल येत्या २ मे रोजी लागणार आहे.