प्रतिनिधी/ बेळगाव
‘हर काम देश के नाम’ या भावनेने सांबरा-बेळगाव येथील एअरमन ट्रेनिंग स्कूलच्या 60 जवानांनी बेळगाव ते गोडचीनमल्की सायकल मोहीम पूर्ण केली. एकूण 92 कि.मी. अंतराची ही सायकल मोहीम होती. स्टेशन कमांडर ग्रुप कॅप्टन झचारीया यांनी शनिवारी सकाळी 6 वाजता या मोहिमेला ध्वज दाखवून शुभारंभ केला.
राष्ट्रीय एकात्मता, विविधतेत एकता व सामाजिक सौहार्द हा संदेश देण्यासाठी तसेच एअरमन्समधील साहस कौशल्य वाढावे, या हेतूने ‘एक भारत श्रे÷ भारत’ अंतर्गत ही मोहीम काढण्यात आली.









