एकूण बाधितांची संख्या 23 हजारांच्या घरात : बुधवारी 164 नवे रुग्ण
प्रतिनिधी /बेळगाव
गेल्या पाच ते सहा महिन्यात बेळगाव जिह्यातील 20 हजार 365 जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्हा आरोग्य विभागाने ही माहिती दिली असून बुधवारी जिह्यातील एकूण बाधितांची संख्या 23 हजारांच्या घरात पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत जिह्यातील 164 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून कोरोनामुळे गोकाक तालुक्यातील एका वृध्देचा मृत्यू झाला आहे.
बुधवारी 164 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बेळगाव शहर व उपनगरांतील 44 व ग्रामीण भागातील 23 असे तालुक्यातील 67 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. गोकाक येथील 75 वषीय वृध्देचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिह्यातील आतापर्यंतचा मृतांचा सरकारी आकडा 320 वर पोहोचला आहे.
आरोग्य विभागाने आतापर्यंत 1 लाख 88 हजार 137 जणांची स्वॅब तपासणी केली असून यामध्ये 1 लाख 60 हजार 473 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आतापर्यंत 20 हजार 365 जणांनी कोरोनावर मात केली असून बेळगाव व उपनगरांसह जिह्यात सध्या कोरोनाचे 2 हजार 289 सक्रिय रुग्ण आहेत. अद्याप 3 हजार 508 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल यायचा आहे.
आंबेवाडी, सुळेभांवी, कुदेमनी, हुदली, काळेनट्टी, खादरवाडी, मजगाव, न्युगांधीनगर, खासबाग, राणी चन्नम्मानगर, रघुनाथपेठ-अनगोळ, रामतीर्थनगर, सदाशिवनगर, सुभाष गल्ली-अनगोळ, रामदेव गल्ली-वडगाव, निलजी, पार्वतीनगर-बेळगाव, पाटील गल्ली, येळ्ळूर, आदर्शनगर-हिंदवाडी, अंजनेयनगर, विनायकनगर, भडकल गल्ली, बाजार गल्ली-खासबाग, भाग्यनगर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
भवानीनगर, चौगुलेवाडी, बसवणकुडची, गांधीनगर-संतीबस्तवाड, श्रीनगर, खडक गल्ली, कणबर्गी, कृषी कॉलनी-भाग्यनगर, टिळकवाडी, टी. व्ही. सेंटर, वैभवनगर परिसरातही बुधवारी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आली आहेत. लक्षणे नसणाऱया बाधितांवर त्यांच्यात्यांच्या घरीच उपचार करण्यात येत आहेत. दिवसेंदिवस बाधितांची संख्या वाढत चालली आहे.