प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनामुळे प्रत्येकाच्याच मनात धडकी भरली होती. गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाचा आलेख घसरत आहे. त्यामुळे सर्वांनाच दिलासा मिळू लागला आहे. मंगळवारी जिह्यात 58 जण नवे रुग्ण आढळून आले आहेत तर एकाचा मृत्यू झाला आहे.
बेळगाव शहर व उपनगरांत मंगळवारी 24 जण कोरोना बाधित आढळले आहेत तर ग्रामीण भागात केवळ 2 जणच कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. बेळगाव तालुक्यात एकूण 26 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बेळगाव जिह्यात एकूण 58 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत तर बेळगावमधील एकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
मंगळवारी शहापूर, रामतीर्थनगर, टिळकवाडी, शाहूनगर, श्रीनगर, वडगाव, अशोकनगर, हनुमाननगर, चिदंबरनगर, कुमारस्वामी लेआऊट, नानावाडी, नाथ पै सर्कल शहापूर या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. ग्रामीण भागामध्ये पिरनवाडी येथेच रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण भागामध्येही कोरोना बाधितांची संख्या कमी होत चालली आहे. त्यामुळे दिलासा मिळू लागला आहे.









