बेळगाव तालुक्यात 62 नवे रुग्ण, एकाचा मृत्यू
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना बाधितांची संख्या एक दिवस कमी होते तर एक दिवस वाढत आहे. मंगळवारी जिह्यामध्ये 205 नवे रुग्ण आढळले आहेत. बेळगाव तालुक्यामध्ये 62 जणांचा यामध्ये समावेश आहे तर एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
कोरोना बरोबर लढण्याची ताकद आता सर्वसामान्य जनतेमध्ये आली असली तरी काही जण भितीमुळे तसेच इतर आजारामुळे दगावत आहेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रयत्न होत असला तरी एकापासून दुसऱयाला हा आजार होत आहे. त्यामुळे जनतेने सावधानता बाळगणे गरजेचे आहे. मंगळवारी 205 रुग्ण आढळले आहेत. ही संख्याही अधिकच आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. तरी देखील बरेच जण घाबरुनच मृत्यू पावत असल्याच्या घटना घडत आहेत. कोरोनामुक्त होणाऱयांची संख्याही वाढली आहे. या आजाराबाबत आता सर्व ती जनजागृती झाली आहे. तेंव्हा जनतेने अजूनही सावधानता बाळगणे गरजेचे आहे.
मंगळवारी शिवबसवनगर, टी. व्ही. सेंटर, कपिलेश्वर रोड, टिळकवाडी, वडगाव, वैभवनगर, भाग्यनगर, कॅम्प, हनुमाननगर, हिंदवाडी, केळकरबाग, कडोलकर गल्ली, कुमारस्वामी लेआऊट, रामतीर्थनगर, सदाशिवनगर, शहापूर, यासह शहराच्या इतर भागांमध्ये रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण भागातही रुग्ण आढळले असून त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळात उपचार सुरु आहेत.









