बेळगाव तालुक्यात रुग्ण संख्या वाढतीच
प्रतिनिधी/ बेळगाव
शुक्रवारी जिह्यात कोरोनाचे 350 नवे रुग्ण आढळून आले आहेत. बेळगाव तालुक्यातही रुग्ण संख्या वाढतीच असून 196 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामध्ये शहर व उपनगरांतील 172 व ग्रामीण भागातील 24 जणांचा समावेश आहे.
खास करुन बेळगाव शहर व उपनगरांत रुग्ण संख्येत झपाटय़ाने वाढ होत आहे. सांबरा एटीएसमध्ये 3, हलभांवी येथील आयटीबीपी सेंटरमधील 6 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर सरकारी वैद्यकीय महाविद्यालय (बिम्स्) 12 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
शुक्रवारी 1 ते 18 वर्षे वयोगटातील 15 हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. इनामबडस, अरळीकट्टी, गणेशपूर, बाळेकुंद्री खुर्द, गणिकोप्प, हिरेबागेवाडी, मुचंडी, सुळेभांवी, शिवापूर, गोडसेवाडी, काळी अमराई, कुवेंपूनगर, महाव्दार रोड, टिळकवाडी, हनुमाननगर, हिंडलगा, हिंदवाडी, खासबाग, जालगार गल्ली, कपिलेश्वर कॉलनी, खडेबाजार परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
सरकारी व खासगी वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी, परिचारीकांनाही कोरोनाची लागण झाली असून विद्यार्थी वसतीगृहात राहणाऱया 15 हून अधिक विद्यार्थ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. महांतेशनगर, मारुती गल्ली, नानावाडी, नेहरुनगर, न्युगांधीनगर, पांगुळ गल्ली, राजारामनगर, रामतीर्थनगर, सदाशिवनगर, उज्वलनगर, वंटमुरी कॉलनी, विजयनगर परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.
बसव कॉलनी, शास्त्राrनगर, आदर्शनगर-वडगाव, आनंदनगर-वडगाव, अंजनेयनगर, अन्नपुर्णेश्वरीनगर-वडगाव, अशोकनगर, ऑटोनगर, कोनवाळ गल्ली, बसवनकुडची, बॉक्साईट रोड, सह्याद्रीनगर, कणबर्गी, शहापूर, शेट्टी गल्ली, संगमेश्वरनगर, भाग्यनगर, भारतनगर-खासबाग, भवानीनगर, बिम्स हॉस्टेल, गुरूप्रसादनगर परिसरातही कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.