आंतर जिल्हा फुटबॉल स्पर्धा : संघाचे आज प्रयाण
प्रतिनिधी / बेळगाव
कलघटगी जि. गुलबर्गा येथे कर्नाटक राज्य फुटबॉल संघटना मान्यताप्राप्त आंतर जिल्हा फुटबॉल स्पर्धेसाठी बेळगाव जिल्हा फुटबॉल संघाची घोषणा करण्यात आली. 20 खेळाडूंचा चमू शनिवारी कलघटगीकडे रवाना होणार आहे.
सुभाष लेले मैदानावर शुक्रवारी सायंकाळी 27 खेळाडूंमधून 20 जणांचा संघ निवडण्यात आला. यावेळी पॅट्रन राम हदगल यांनी संघाचा कर्णधार नजिब इनामदार याला कॅप्टन बँड घालून त्याचा गौरव केला. नजिब इनामदार (कर्णधार), विल्सन स्टिव्हन (उपकर्णधार), धनिष्क सावंत, ओम कदम, कौस्तुभ गेंजी, किसन पटेल, पवन देसाई, प्रतिक बागेवाडी, सुनील भांदुर्गे, डायमंड, श्रीनंद पाटील, किरण जोगानी, शंतनु हदगल, तुषार पवार, राहुल गुरव, सिल्व्हेस्टर पेस, जयस सांबरेकर, श्रीहरी योदगी, हर्षन देसाई, तेजस पाटील यांची निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. या संघाच्या प्रशिक्षकपदी बेळगावचे ज्ये÷ खेळाडू अल्लाबक्ष बेपारी, मतिन इनामदार व गिरीश गणेशकर यांची निवड करण्यात आली आहे.
निवड झालेल्या खेळाडूंना स्वागत समारंभात बेळगाव जिल्हा फुटबॉल संघाचे अध्यक्ष पंढरी परब, पॅट्रन राम हदगल, सचिव अमित पाटील, रमेश गुज्जर, गोपाळ खांडे, लेस्टर डिसोझा, उमेश मजुकर आदी पदाधिकाऱयांनी पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. सदर संघ शनिवारी रात्री गुलबर्ग्याला रवाना होणार आहे. सोमवार दि. 28 डिसेंबरपासून आंतरजिल्हा स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.









