प्रतिनिधी/ बेळगाव
गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांची बेळगाव जिल्हा पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कर्नाटक सरकारच्या मुख्यकार्यदर्शींनी हा आदेश दिला. रमेश जारकीहोळी यांना दुसऱयांदा बेळगाव जिल्हय़ाच्या पालकमंत्री पदाचा मान लाभला आहे. विद्यमान पालकमंत्री जगदीश शेट्टर यांच्या जागी त्यांची वर्णी लागली आहे.