म. ए. समिती युवा आघाडी-खानापूर युवा समितीची हेस्कॉमकडे निवेदनाद्वारे मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव व खानापूर तालुक्मयात विजेच्या समस्यांनी ग्रामीण भागातील नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे शेतकरी व व्यावसायिकांना आर्थिक फटका बसत आहे. दोन्ही तालुक्मयात विद्युत स्टेशनची संख्या वाढवावी, अशी मागणी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती युवा आघाडी व खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने हेस्कॉमच्या अधिकाऱयांकडे सोमवारी निवेदनाद्वारे केली.
बेळगाव तालुक्मयातील बिजगर्णी व आसपासच्या परिसरात वरचेवर विजेचा लपंडाव सुरू आहे. तसेच या परिसरात सबस्टेशन उभारणी करण्याची घोषणा करून अनेक दिवस झाले. तरी, अद्याप त्याची कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे बिजगर्णी परिसरात सबस्टेशन उभे करावे. तसेच राज्यात करण्यात आलेली वीज दरवाढ ही सर्वसामान्यांसाठी डोईजड असून, ती दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी युवा आघाडीने केली आहे.
खानापूर तालुक्मयात ऐन पावसाळय़ात विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. हेस्कॉममध्ये कर्मचाऱयांची संख्या कमी असल्याचे कारण वरचेवर देण्यात येते. तालुक्मयात अनेक विद्यार्थ्यांनी तांत्रिक शिक्षण घेतले असून, त्यांना कंत्राटी पद्धतीने सेवेत सामावून घ्यावे, भूमिगत वीजवाहिन्या घालण्याची मंजुरी द्यावी, निरंतर ज्योती योजनेंतर्गत वापरण्यात आलेले साहित्य निकृ÷ दर्जाचे असून, त्याचे ऑडिट करावे, तसेच हलसी व बैलूर येथे सबस्टेशन लवकर उभे करावे अशी मागणी करण्यात आली आहे.
हेस्कॉमचे अधिकारी श्रीधर गुडीमनी यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक, सेपेटरी मनोहर संताजी, ऍड. सुधीर चव्हाण, ऍड. श्याम पाटील, मयुर बसरीकट्टी, राजू किणयेकर, ऍड. महेश मोरे, खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, सचिव सदानंद पाटील, दामोदर नाकाडी, नवनाथ पुजारी, किशोर हेब्बाळकर, विशाल बुवाजी, सुधाकर देसाई व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.









