बेळगाव : कोरोनामुळे पुन्हा धास्ती वाढली. महाराष्ट्रात रुग्णांची संख्या वाढल्यामुळे महाराष्ट्रातून येणाऱया सर्व रस्त्यांवर चेकपोस्ट करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातून येणाऱया प्रवाशांना कोरोना चाचणी सक्तीची करण्याचा आदेश दिल्यामुळे बेळगाव-कोवाड रस्त्यावर नाकाबंदी करण्यात आली आहे. त्या ठिकाणी पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी भेट देवून पाहणी केली. याचबरोबर अधिकाऱयांकडून माहिती देखील जाणून घेतली आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत.
रुग्ण संख्या वाढल्यामुळे कर्नाटकाने त्याची धास्ती घेतली. महाराष्ट्रातून येणाऱया सर्व रस्त्यांवर आता तपासणी सुरू करण्यात आली आहे. बेळगाव आणि चंदगड तालुक्मयाचा संपर्क अत्यंत जवळच आहे तसेच रोजचा आहे. दररोज मोठय़ा प्रमाणात वाहने बेळगावात दाखल होतात. याचबरोबर बेळगावातील जनताही कामानिमित्त चंदगड तालुक्मयामध्ये जात असते. बेकिनकेरे गावापासून केवळ 2 कि.मी. वर महाराष्ट्राची हद्द आहे. कोवाड केवळ 10 कि.मी.वर आहे. त्यामुळे दैनंदिन व्यवहार सुरू असतात.
पोलीस आयुक्त डॉ. विक्रम आमटे आणि काकती पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षर रमेश हळ्ळूर यांनी मंगळवारी भेट देवून पाहणी केली. यावेळी येणाऱया नागरिकांना तपासणी करताना त्यांच्याशी आपुलकीने बातचीत करा असे त्यांनी सांगितले. याचबरोबर कोविड टेस्ट केलेला अहवाल असेल तर त्यांना प्रवेश द्या नाही तर परत पाठवा, असे त्यांनी सांगितले.









