बेळगाव/प्रतिनिधी
राज्यात ब्लॅक फंगस हा अधिसूचित रोग म्हणून घोषित करूनही रुग्णांच्या संख्येबाबत सरकार संभ्रमित आहे. केंद्र आणि राज्याच्या मंत्र्यांच्या विधानांमध्ये ही आकडेवारी वेगळी आहे. केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात राज्यातील रुग्णांची संख्या ५०० असल्याचे सांगितले होते. दरम्यान बेळगावात ब्लॅक फंगसचे ८ ते १० रुग्ण असून त्यांच्यावर सिव्हिल रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत.
दरम्यान बेळगाव जिल्ह्यातही ब्लॅक फंगसचे ८ ते १० रुग्ण आढळले आहेत. बुधवारी ब्लॅक फंगस उपचारासंदर्भात बोलताना जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी बेळगाव जिल्ह्यातील ब्लॅक फंगसच्या रुग्णांवर हुबळीच्या किम्स रुग्णायात दाखल करण्याची सूचना शासनाने केली होती. परंतु आता राज्यसरकारने राज्यातील सर्व जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार देण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे आजपासून बिम्स इस्पितळात उपचारांची सोय करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
जिल्ह्यात ब्लॅक फंगसचे ८ ते १० रुग्ण आढळले असून रुग्णांना आवश्यक उपचार देण्यात येतील असे जिल्हाधिकारी म्हणाले. ब्लॅक फंगसवरील औषधे जिल्हा प्रशासनाला काल रात्री उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यानंतर लगेचच आजपासून बिम्स इस्पितळात उपचारांची सोय करण्यात आली आहे.