बेळगाव/प्रतिनिधी
राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामध्ये बेळगावमध्येही दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. बेवळगावात रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यांच्या उपचाराकरिता बेड, आइसोलेशन केंद्र आणि ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. जिल्ह्यातील या गंभीर परिस्थितीची जानवी ठेवून, बेळगावचे भाजप नेते व कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चा सचिव किरण जाधव यांनी कर्नाटकचे अवजड व लघु उद्योग मंत्री जगदीश शेट्टर यांची भेट घेऊन बेळगाव येथे कोविड आइसोलेशन केंद्र लवकरात लवकर सुरु करावे अशी निवेदनाद्वारे त्यांनी मागणी केली.
किरण जाधव यांनी बेळगाव येथील ऑटो नगर येथे स्थित केएसटीआयडीसीएल (Karnataka State Textile Infrastructure Development Corporation Limited) चा प्रशस्त ३५ ते ४० हजार स्क्वेर फूटचा हॉल रिकामा आहे. या परिसरात झाडांची संख्याही जास्त आहे. त्यामुळे तेथे कोविड आइसोलेशन केंद्र लवकरात लवकर सुरू करावे जेणेकरून उपचार घेणाऱ्या रुग्णांना शुद्ध ऑक्सिजन मिळेल व रुग्ण लवकर बरे होतील व रुग्णांची योग्य व्यवस्था होईल. दरम्यान, मंत्री जगदीश शेट्टर यांनी निवेदन स्वीकारून याठिकाणी लवकरच काम करू असे आश्वासन दिले.