अवघ्या 35 मिनिटांचा प्रवास
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगावमधून गोव्याला विमानसेवा सुरू करण्याची मागणी मागील अनेक दिवसांपासून करण्यात येत आहे. परंतु अद्याप ही मागणी पूर्ण झालेली नाही. कमी अंतराचा प्रवास असल्याने याला विमानोड्डाण खात्याने परवानगी दिलेली नाही. परंतु एक स्पेशल फ्लाईट पहिल्यांदाच बेळगाव ते गोवा असा प्रवास करणार आहे. यामुळे अवघ्या 35 मिनिटांमध्ये प्रवासी गोव्याला पोहोचणार आहेत.
गुरुवार दि. 18 मार्च रोजी दुपारी 12 वाजता गोव्याहून निघालेले विमान 12.35 वाजता बेळगावला पोहचणार आहे. 21 मार्च रोजी दुपारी 3.15 वाजता बेळगाव येथून निघालेले विमान 3.40 वाजता गोव्याला पोहचणार आहे, अशी या स्पेशल फ्लाईटची फेरी असणार आहे. गोवा हे एक पर्यटनस्थळ असल्याने येथे येणाऱया-जाणाऱया प्रवाशांची संख्या अधिक असल्याने यापुढे ही सेवा नियमित ठेवण्याची मागणी होत आहे.









