प्रतिनिधी/ बेळगाव
वेर्णा गोवा येथील अस्वीक मेमोरियल फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत बेळगावच्या मुलींचा संघ पोहोचला आहे. आर. डी. फुटबॉल अकादमी व बेळगाव युनायटेड अकॅडमी अशा संयुक्त अकादमीच्या या मुलींनी अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना मंगळवारी रात्री उशिराने संपन्न होणार होता. विजेत्यांना 10 हजार रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे.
हेमांशी गौर, पल्लवी चौगुले, प्राची ऊंदे, उत्तरा चव्हाण, प्रियंका कंग्राळकर, वेदीका मुतकेकर, वैष्णवी पाटील, समृद्धी चव्हाण यांचा या संघामध्ये समावेश आहे.









