सांगली / प्रतिनिधी
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील लॉकडाऊनमुळे असंख्य परप्रांतीय कामगारांचे स्थलांतर झाले. त्यामुळे आता अनलॉक 5.0 अंतर्गत काही अटी व शर्तींच्या आधारे सुरु झालेल्या औदयोगिक कंपन्यांना मोठया प्रमाणात मनुष्यबळांची कमतरता भासत आहे. या अनुषंगाने जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र,सांगली या कार्यालयाच्या वतीने नोकरी इच्छुक बेराजगार उमेदवारांसाठी दिनांक 22 व 23 ऑक्टोंबर 2020 ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त ज. बा. करीम यांनी दिली आहे.
या ऑनलाईन रोजगार मेळाव्यांतर्गत सांगली जिल्हयातील नामवंत विविध उदयोजकांकडील वेल्डर, फिटर, टर्नर, इंजिनिअरींग डिप्लोमा, या सारख्या पदांसाठी आवश्यक ती पात्रताधारक तसेच, एसएससी,एच्एससी,पदवीधर व पदव्यूत्तर उमेदवारांसाठी रिक्तपदे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
सदरचा मेळावा हा केवळ ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणा-या उमेदवारांसाठीच घेण्यात येणार आहे. इच्छुक बेरोजगार उमेदवारांनी दिनांक 21 ऑक्टोबर 2020 पर्यंत आपापले पसंतीक्रम नोंदवून या संधीचा न चुकता लाभ घ्यावा, असे आवाहनही सहाय्यक आयुक्त, ज. बा करीम यांनी केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








