वृत्तसंस्था/ लंडन
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या पुरुषांच्या क्वीन्स क्लब आंतरराष्ट्रीय ग्रासकोर्ट टेनिस स्पर्धेत गुरुवारी इटलीच्या टॉप सिडेड मॅटो बेरेटिनीकडून ब्रिटनच्या माजी टॉप सिडेड अँडी मरेचा आव्हान समाप्त झाले.
ब्रिटनच्या 34 वर्षीय अँडी मरेने यापूर्वी दोनवेळा विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली आहे. तब्बल तीन वर्षानंतर मरेने क्विन्स क्लब टेनिस स्पर्धेत आपले पुनरागमन केले होते. पण इटलीच्या बेरेटिनीने मरेचा 6-3, 6-3 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. 25 वर्षीय बेरेटिनी आणि ब्रिटनचा इव्हान्स यांच्यात उपांत्यपूर्व फेरीची लढत होईल. इव्हान्सने फ्रान्सच्या मॅनेरिनोचा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले.









