साहित्य : 250 ग्रॅम बेबीकॉर्न, 2 चमचे गव्हाचे पीठ, 2 चमचे तांदळाचे पीठ, 2 चमचे कॉर्नफ्लोर, 1 चमचा गरम मसाला पावडर, 1 चमचा चाट मसाला, 2 चमचे लाल तिखट पावडर, 1 चमचा आलं-लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, तेल तळण्यासाठी
कृती : पॅनमध्ये पाणी गरम करण्यास ठेवावे. उकळी आली की त्यात मीठ आणि बेबीकॉर्न टाकून पुन्हा उकळी काढावी आणि निथळावे. एका बाऊलमध्ये गव्हाचे पीठ, तांदळाचे पीठ, कॉर्नफ्लोर, गरम मसाला पावडर, चाट मसाला, लाल तिखट पावडर, आलं-लसूण पेस्ट आणि मीठ टाकून मिश्रण मिक्स करावे. नंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून भज्याच्या पीठाप्रमाणे बनवून घ्यावे. आता त्यात निथळलेले बेबीकॉर्न घालून मिक्स करावे. गॅसच्या मध्यम आचेवर कढईत तेल गरम करावे. तेल चांगले गरम झाले की आच मंद करून त्यात तयार बेबीकॉर्न सोडावेत. बेबीकॉर्न हलक्या सोनेरी रंगावर तळावेत. आता तयार बेबीकॉर्न फिंगर फ्राय सॉससोबत खाण्यास द्या.









