प्रतिनिधी / फलटण :
कोळकी (ता. फलटण) येथील बेपत्ता तरुणीचा मृत्यदेह आज सकाळी झिरपवाडी गावच्या हद्दीतील विहिरीत आढळून आला.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, अनघा विष्णु नाळे (वय 24 ) ही तरुणी महादेवनगर कोळकी येथून निघुन गेली होती. तिचा शोध घेतला असता तिच्या नातेवाईकांना आज सकाळी 7 वाजता तिचा मृतदेह झिरपवाडी गावच्या हद्दीतील सिताराम गुंजवटे यांच्या मालकीच्या शिवारातील विहरीत आढळून आला. मयत तरूणीचे मामा मेघराज पोपट बोराटे ( रा. फरांदवाडी ) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात सदर तरूणी बेपत्ता असल्याची फिर्याद दिली होती. फलटण पोलीस अधिक तपास करत आहेत.









