प्रतिनिधी / नागठाणे
कामेरी (ता.सातारा) येथे कृष्णा नदीत मासे पकडण्यासाठी गेलेल्या इसमाचा मृतदेह तुकाईवाडी (ता.सातारा) गावच्या हद्दीत कृष्णा नदीपात्रात बुधवारी आढळून आला.गुलाब विठ्ठल शेडगे (वय.७०, रा.अंगापूर,ता.सातारा) असे या इसमाचे नाव आहे.
सोमवारी सकाळी ६.३० वाजता गुलाब शेडगे हे कामेरी गावच्या हद्दीत कृष्णा नदीपात्रात मासे पकडण्यासाठी गेले होते. ते परत घरी न परतल्याने कुटुंबीय त्यांचा शोध घेण्यासाठी कामेरी येथे नदीपात्रात गेले.नदीकिनारी त्यांना कापडी पिशवी, मोबाईल व चप्पल आढळली.मात्र गुलाब शेडगे आढळून आले नाही. दोन दिवस नातेवाईक त्यांचा शोध घेत होते.
बुधवारी सकाळी तुकाईवाडी गावच्या हद्दीत कृष्णा नदीपात्रात लकडी बंधाऱ्याजवळ एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला. नातेवाईकांनी तेथे जाऊन पाहिले असता तो मृतदेह गुलाब विठ्ठल शेडगे यांचा असल्याचे निष्पन्न झाले.या घटनेची फिर्याद पुतण्या अमोल परशुराम शेडगे याने बोरगाव पोलिस ठाण्यात दिली आहे.
Previous Articleचिपळुणात गुरे वाहतूक करणारा कंटेनर पकडला
Next Article पुणे विभागातील 3 लाख 47 हजार 484 रुग्ण कोरोनामुक्त









