वृत्तसंस्था/ लंडन
2019 च्या क्रिकेट हंगामात दर्जेदार कामगिरी करणारा इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्ट्रोक्स याची विस्डेनतर्फे सर्वोतम अघाडीचा क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीने विस्डेनतर्फेचा हा बहुमान यापूर्वी सलग तीन वर्षे पटकाविला होता.
2020 च्या विस्डेन क्रिकेटपटूंच्यावतीने 2019 सालातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू म्हणून ऑस्ट्रेलियाच्या एलीस पेरीची निवड करण्यात आली. गेल्या खेपेला हा पुरस्कार भारताच्या स्मृती मानधनाने मिळविला होता. विस्डेनचा हा पुरस्कार मिळविणारा 2005 नंतर स्टोक्स हा इंग्लंडचा दुसरा क्रिकेटपटू आहे. 2005 साली इंग्लंडचा तत्कालीन कर्णधार अँड्रय़ू फ्लिन्टॉफने हा पुरस्कार मिळविला होता. गेल्यावर्षी आयसीसीची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा पहिल्यांदा इंग्लंडने जिंकली होती. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात स्टोक्सची कामगिरी महत्त्वाची ठरली होती. या अंतिम सामन्यात त्याला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले होते. ऍशेस मालिकेतील तिसऱया सामन्यात स्टोक्सने इंग्लंडला विजय मिळवून देताना नाबाद 135 धावांची खेळी केली हाती.
महिलांच्या क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या एलीस पेरीने 2019 च्या क्रिकेट हंगामात आपल्या कामगिरी सातत्य राखले. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या वनडे सामन्यात पेरीने 22 धावांत 7 गडी बाद करून आपल्या संघाला दणदणीत विजय मिळवून दिला होता. तसेच इंग्लंडविरूद्धच्या एकमेव कसोटीत पेरीने पहिल्या डावात 116 आणि दुसऱया डावात नाबाद 76 धावा झळकविल्या होत्या.









