वार्ताहर/ हिंडलगा
बेनकनहळ्ळी ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत अधिकाधिक नवीन चेहऱयांना मतदारांनी आपली पसंती दर्शविली असून जुन्या नऊ उमेदवारांनी देखील आपला अनुभव पणाला लावत विजय मिळविला आहे. म. ए. समितीसह अपक्ष उमेदवारांचा मोठय़ा प्रमाणात भरणा होता. त्युमळे ग्रा. पं. ची सत्ता कोणाकडे जाणार याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. एकूण 36 सदस्य संख्या असलेली ही पंचायत तालुक्याच्या पश्चिम भागातील सर्वात मोठी ग्राम पंचायत बनली असून बेनकनहळ्ळीसह गणेशपूर, सरस्वतीनगर, क्रांतीनगर, ज्योतीनगर व सावगावचा कार्यक्षेत्राचा समावेश आहे. त्यामुळे पंचायतीत निवडून येण्यासाठी उमेदवारांमध्ये जोरदार रस्सीखेच झाली होती. त्यामध्ये ग्राम पंचायतीच्या वॉर्ड क्र. 1 मधून कल्लाप्पा देसूरकर, भरमा कोलकार, वॉर्ड क्र. 2 मधून गणेश सुतार, शिल्पा मुंगळीकर, कलावती देसूरकर, वॉर्ड क्र. 3 मिनाक्षी पाटील, महेश कोलकार, वॉर्ड क्र. 4 सागर लाखे, संदीप डावाळे, लक्ष्मी शिंदे, वॉर्ड क्र. 5 पप्पू भोसले, अंजना नाईक, वॉर्ड क्र. 6 प्रेमा हिरोजी, सचिन दावणे, मोनेश्वर गरग, मनीषा मोरे, वॉर्ड क्र. 7 उमेश चोपडे, ललिता दंडगलकर, अश्विनी लोहार, वॉर्ड क. 8 मंजुषा नाईक, दिनेश लोहार, निकिता दंडगलकर, वॉर्ड क्र. 9 मोहन सांबरेकर, सचिन जाधव, शिला सांबरेकर, सायराबानू हुक्केरी, वॉर्ड क्र. 10 संदीप पाटील, अनुराधा वाघमारे, पद्मजा अलगुंडी, वॉर्ड क्र. 11 वाय. एम. पाटील, संगीता बाणेकर, कल्लाप्पा रामा बाणेकर, वॉर्ड क्र. 12 मधून कल्लाप्पा मल्लाप्पा पाटील, गीता सावगावकर, गणपत पाटील, लक्ष्मी सुतार, हे विजयी झाले आहेत.









