शहर पोलिसांत गुन्हा दाखल
प्रतिनिधी/ सातारा
बंडातात्यांनी वाईनप्रकरणावरुन साताऱयात दंडवंत दंडुका आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान केलेल्या वक्तव्याप्रकरणी राज्यात वातावरण चांगलेच तापले होते. शहर पोलिसांनी रात्री उशिरा 121 वारकऱयांवर जमाव एकत्र केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. तर वक्तव्यप्रकरणांवरुन बंडातात्यांवरुन सातारा जिह्यातील वातावरण ऐन थंडीत चांगलेच तापले होते. त्यांना चौकशीकामी पोलिसांनी पिंपद्र येथील गोशाळेतून ताब्यात घेतले. दोन तास चौकशी करुन नोटीस बजावून सोडून देण्यात आले. शहर पोलीस ठाण्यास छावणीचे स्वरुप आले होते. वारकरी व पक्षीय महिलांनीही गर्दी केलेली होती.
राजकीय पुढाऱयांच्यासह महिला पुढाऱयांवर बंडातात्यांनी त्यांच्या शैलीत समाचार घेतला होता. त्यावरुन सातारा शहरासह राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. बंडातात्यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या आंदोलनामुळे 121 वारकरांच्यावर शहर पोलिसांनी सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच बंडातात्यांनीही जाहीरपणे मीडियाकडे माफीही मागीतली होती. तरीही शुक्रवारी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महिला आक्रमक झाल्या होत्या. त्यांनी बंडातात्यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्याची मागणी केली होती. त्या मागणीनुसार सातारा पोलिसांनी बंडातात्यांना पिंप्रद येथील गोशाळेतून ताब्यात घेऊन पोलीस बंदोबस्तात सातारा शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. शहर पोलीस ठाण्यात बंडातात्यांची चौकशी तब्बल दोन तास पोलिसांनी केली. दोन तासाच्या चौकशीदरम्यान, शहर पोलिस ठाण्याच्या बाहेर वारकरी, पोलीस व महिला कार्यकर्त्यांची चांगली गर्दी झाली होती. बंडातात्यांची चौकशी केल्यानंतर त्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले.
बंडातात्यांच्यावर दोन गुन्हे दाखल
बंडातात्यांच्यावर दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एक गर्दी जमवल्याचा आणि दुसरा महिलांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबाबतचा. या प्रकरणी बंडातात्यांची दोन तास चौकशी करण्यात आली. त्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले.
शहर पोलीस ठाण्याच्या बाहेर मोठी गर्दी
शहर पोलीस ठाण्याच्या आवारात सकाळपासून मोठी गर्दी पहायला मिळत होती. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखली जावी याकरता आंदोलन करण्यासाठी आलेल्या महिलांच्याकडून आक्रमकपणाने कायदा हातात घेण्याची शक्यता निर्माण झाल्याने शहर पोलिसांनी मोठा बंदोबस्त पोलीस ठाण्याच्या बाहेर ठेवण्यात आला होता.
बंडातात्यांना नोटीस देऊन सोडले
बंडातात्यांना दुपारी नोटीस देऊन सातारा शहर पोलिसांनी त्यांना सोडले. पोलीस ठाण्याच्या बाहेर त्यांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली होती. त्यांच्या खाजगी वाहनाने ते परत पिंप्रद येथे फिरले.








