वाळपई वनखात्यातर्फे गस्त सुरू
प्रतिनिधी / वाळपई
सध्या पावसाळी मोसम सुरू झालेला आहे यामुळे सर्वत्र बेडकांची डराव डराव सुरू होणार आहे .आजही या बेडकांना खाण्यासाठी अनेकांचे जीभ आसुसलेली असते. मात्र बेडकांची शिकार करण्यासाठी टपलेल्या खवय्यांना वनखात्याचा चांगलीच चपराक बसण्याची शक्मयता आहे. वन्य जीव संरक्षण कायदा अंतर्गत बेडकाची शिकार करणे अत्यंत गैर आहे.
यामुळे येणाऱया काळात बेडकांची शिकार करण्यास सापडल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा वाळपई परिक्षेत्र अधिकारी दीपक तांडेल यांनी दिला आहे. सध्यातरी यासंदर्भात गस्त सुरू झाली असून सत्तरी तालुक्मयाच्या कोणत्याही भागामध्ये बेडकांची शिकार करताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारची माहिती दीपक तांडेल यांनी दिली आहे.
याबाबतची माहिती अशी की जम्पंग चिकन यांच्या नावावर मोठय़ा प्रमाणात बेडकांची शिकार होताना दिसत आहे. खासकरुन रात्रीच्या वेळी नैसर्गिक स्थरावर बेडूक खाद्यासाठी मुक्तपणे हिंडत असतो. अनेक वेळा बेडके रस्त्यावर आपणास पहावयास मिळतात. खासकरून नदीच्या शेजारी रानामध्ये मोठय़ा प्रमाणात बेडुक आढळून येत असतो. नदी नाल्यात बेडकांचे डराव डराव सातत्याने ऐकायला मिळते. काही देशांमध्ये बेडूक हा काहीजणांचा अत्यंत आवडता मांसाहारी प्राणी आहे. गोव्यातही याचे मोठय़ा प्रमाणात खवय्ये आहेत. यामुळे गेल्या काही वर्षापासून बेडकांचे शिकार मोठय़ा प्रमाणात होत असते. पावसाळय़ात हा प्रकार सर्रासपणे आढळतो. मात्र वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत बेडकाचे शिकार करणे अत्यंत बेकायदेशीर आहे. यामुळे जैवविविधता संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून बेडकाचे शिकार येणाऱया काळात मोठय़ा प्रमाणात संकटे निर्माण करण्याची शक्मयता असल्यामुळे वन खात्यातर्फे त्यांचे संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळय़ा स्तरावर प्रयत्न करण्यात येत असतात.
सत्तरी तालुका हा पूर्णपणे जैविक संपत्तीने भरलेला असल्यामुळे या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात बेडकांची संख्या आढळून येत असते. यामुळे या भागांमध्ये मोठय़ा प्रमाणात शिकार होत असल्याचे वनखात्याचे म्हणणे आहे .यंदा मात्र यासंदर्भात वनखात्याने बेकायदेशीर बेडकांची शिकार करणाऱया विरोधात मोहीम उघडली आहे .यामुळे यासंदर्भातील शिकार करताना आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारची माहिती दीपक तांडेल यांनी दिली.
हाँटेल्स, उपहारगृहाना नोटीसा बजाविणार
त्याचप्रमाणे सत्तरी तालुक्मयाच्या वेगवेगळय़ा हॉटेल्स व उपहारगृहाना यासंदर्भात नोटिसा बजावण्यात येणार असून सदर ठिकाणी बेडकांची कत्तल करण्याचा प्रयत्न झाल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल अशी माहिती यावेळी त्यांनी दिली .मान्सूनला सुरुवात झाली असून एकूण चार पथके तयार करून सत्तरी तालुक्मयाच्या वेगवेगळय़ा ठिकाणी सातत्याने गस्त घालण्यात येत आहे. खास करून ही पथके वेगळय़ा ठिकाणी जाऊन यासंदर्भाची चौकशी करीत असून बेडकाची शिकार करताना आढळल्यास कारवाई करण्यात येईल अशा प्रकारची माहिती यावेळी त्यांनी दिली.
राज्याच्या इतर भागातून नागरिक करतात शिकार.
महत्वाचे म्हणजे गोव्याच्या इतर तालुक्मयातून जम्पंग चिकन यासाठी आसुसलेले खवय्ये सत्तरी तालुक्मयाच्या वेगवेगळय़ा भागांमध्ये बेडकांची शिकार करण्यासाठी असतात याची दखल घेऊन टप्प्याटप्प्याने वाळपई शहरातून बाहेर जाणाऱया मार्गावर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यावरही भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेले आहे. यामुळे शिकारीचा प्रकार होणार नाही याची विशेष दखल प्रत्येक गावातील नागरिकाने घेणे गरजेचे असून यामुळे पर्यावरण संवर्धन व जैवविविधता रक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून अशाप्रकारे महत्त्वाचे मदत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.









