बंधाऱयावरील रस्ता गेला वाहून : तलाव फुटण्याची शक्मयता असल्याने ग्रामस्थांतून तीव्र संताप

प्रतिनिधी / बेळगाव
बेकिनकेरे-अगसगे मार्गावर बेकिनकेरे गावानजीक असलेला तलाव धोकादायक बनला असून तलावाचा बंधारा घसरून फुटण्याची स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तलावाला संरक्षक भिंत बांधावी, अशी मागणी करूनही याकडे दुर्लक्ष झाल्याने तलावाच्या बंधाऱयावरील रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. ग्रा. पं. लोकप्रतिनिधींनी व संबंधित खात्याच्या अधिकाऱयांनी तलावाच्या बंधाऱयाची पाहणी करून संरक्षक भिंत तातडीने उभारावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत
आहे.
बेकिनकेरे-अगसगे मार्गावर असलेल्या या तलावाच्या बंधाऱयावरून चलवेनहट्टी, म्हाळेनट्टी, अगसगे व कडोली भागात जाणाऱया वाहनधारकांची संख्या अधिक आहे. शिवाय शिवारात जाणाऱया शेतकऱयांची संख्याही मोठी आहे. मात्र, हा बंधारा वाहतुकीसाठी धोकादायक ठरत असून येथून ये-जा करणे धोक्मयाचे बनत आहे. बंधाऱयावरील रस्ता घसरून केवळ तीन फूट शिल्लक आहे. शिवाय बंधाऱयाची सद्यस्थिती पाहता बंधारा कधी फुटेल, याचा नेम नाही. त्यामुळे ग्रा. पं. ने तातडीने तलावाच्या संरक्षक भिंतीच्या कामाला सुरुवात करण्याची मागणी होत आहे.
अवजड वाहनांसाठी मार्ग आता जीवघेणा
या मार्गावरील बंधाऱयाचा भरावा घसरून रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. शिवाय दिवसेंदिवस मातीही ढासळत असल्याने तलाव धोकादायक बनला आहे. सध्या बंधाऱयावर केवळ पाच ते सहा फूट जागा शिल्लक आहे. त्यामुळे रात्रीच्या अंधारात वाहने घसरून अपघात होण्याची शक्मयता आहे. शिवाय अवजड वाहनांसाठी हा मार्ग आता जीवघेणा ठरत आहे.
शेतीला जोडधंदा म्हणून मोठय़ा प्रमाणात जनावरे पाळली जातात. त्यामुळे गावात जनावरांची संख्या अधिक आहे. शिवाय गवळी बांधवांची संख्याही अधिक आहे. मात्र, जनावरांच्या पाण्याची कोठेही सोय नाही. त्यामुळे जनावरांना तलावातच सोडले जाते. मात्र, संरक्षक भिंत नसल्याने जनावरांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून ग्राम पंचायतीकडे तक्रारी देऊनही साफ दुर्लक्ष झाल्याने ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
बंधाऱयावरील रस्ताही धोकादायक

गावाशेजारील असलेल्या तलावातील बंधाऱयाची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे बंधाऱयावरील रस्ताही धोक्मयाचा बनला आहे. याबाबत ग्रा. पं. सदस्यांकडे तक्रार केली आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष झाले आहे. शिवाय बंधाऱयाचा भरावा ढासळत चालल्याने ये-जा करणेदेखील धोक्मयाचे बनले आहे.
-सोमनाथ भडांगे ( ग्रामस्थ)
संरक्षक भिंत बांधणार

मागील पावसाळय़ात तलाव पूर्ण क्षमतेने भरला होता. त्यामुळे बंधाऱयावरील संरक्षक भिंतीचे काम थांबले होते. आता या कामाबाबत कंत्राटदाराला भेटून काम सुरू करण्याविषयी सांगण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच तलावाच्या संरक्षक भिंतीच्या कामाला सुरुवात होणार आहे.
–गजानन मोरे (ग्रा. पं. माजी सदस्य)









